• अँडोरा नुकताच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (International Monetary Fund - IMF) १९० वा सदस्य म्हणून सामील झाले आहे.

ठळक मुद्दे

  • अँडोरा हे फ्रान्स आणि स्पेन दरम्यान स्थित असणारे एक मायक्रोस्टेट असून युरोपमधील सर्वात मोठे मायक्रोस्टेट आहे.

  • IMF च्या सदस्यत्वामुळे अँडोरच्या सरकारला IMF धोरणातील सल्ल्याचा लाभ घेणे शक्य होईल.

  • कोविड-१९ मुळे उद्भवणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेचे वार्षिक पुनरावलोकन किंवा आरोग्य तपासणीबाबत सहाय्य, तांत्रिक सहाय्य इ. IMF द्वारे मिळू शकते.

IMF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IMF म्हणजेच International Monetary Fund अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी होय.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली IMF ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन, डीसी, युनायटेड स्टेट्स हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • व्यवस्थापकीय संचालक: क्रिस्टलिना जॉर्जिएवा या पदावर विराजमान आहेत.

  • सदस्य देश: IMF चे १८९ सदस्य देश आहेत. अँडोरा नुकताच १९० वा सदस्य म्हणून सामील झाले आहे.