• भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत याने जानेवारी २०२१ चा 'ICC प्लेअर ऑफ द मंथ (ICC Player of the Month)' पुरस्कार जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारी २०२१ मध्ये २ कसोटी सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

  • त्याने सिडनी येथे ९७ तर ब्रिस्बेन येथे नाबाद ८९ धावा करत भारताला एक अविश्वसनीय मालिका विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

  • जानेवारी २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माईलने ३ एकदिवसीय आणि २ टी - २० सामन्यांत उत्तम कामगिरी बजावल्यानंतर तिची जानेवारी २०२१ ची 'महिला ICC प्लेअर ऑफ द मंथ (ICC Women’s Player of the Month)' म्हणून निवड करण्यात आली आहे.

ICC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.

  • स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.

  • सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.

  • सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.

  • ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.