• भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला उत्कृष्ट कामगिरीसाठी 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player of the Month)' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • इंग्लंडविरुद्ध मार्चमध्ये नुकत्याच झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत केलेल्या कामगिरीबद्दल त्याला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

  • या वर्षाच्या सुरूवातीपासून भुवनेश्वर हा सलग तिसरा भारतीय पुरस्कार प्राप्तकर्ता बनला आहे.

ICC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.

  • स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे चेअरमन: इम्रान ख्वाजा (अंतरिम) हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.

  • सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.

  • सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.

  • ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.