-
भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडची सलामीवीर टेमी ब्यूमॉन्ट यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC) फेब्रुवारी महिन्याचा 'ICC प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player of Month)' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
अश्विनने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
-
सदर मालिकेत त्याने सर्वाधिक ३२ बळी मिळवून चेन्नईतील दुसर्या कसोटी सामन्यात शतक ठोकले.
-
इंग्लंडची सलामीवीर टेमी ब्यूमॉन्टला विशेष कामगिरीसाठी सदर पुरस्कार मिळाला आहे.
ICC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.
-
स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.
-
सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.