-
हरित विकास सुनिश्चित करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने पंजाब सरकारमार्फत ‘आय रखवाली (I Rakhwali)’ नावाच्या अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
पंजाबमधील पर्यावरणाचे रक्षण आणि जतन करण्याच्या हेतूपूर्तीसाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये लोकांना भागधारक बनविण्याच्या मोहिमेस पूरक ठरण्यासाठी सदर अॅपचा विकास करण्यात आला आहे.
-
‘आय रखवाली’ अॅप लोकांना अधिकाधिक झाडे लावण्यास आणि ‘हरित संरक्षक’ होण्यासाठी प्रेरणा देईल अशी अपेक्षा आहे.
-
लोकांना या प्रक्रियेमध्ये भागीदार बनवून राज्य आपल्या वनक्षेत्राचे रक्षण करण्यास सक्षम होईल अशी अपेक्षा आहे.
पंजाब राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: कॅप्टन अमरिंदर सिंग हे सध्या पंजाब राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: व्ही. पी. सिंग बदनौर हे सध्या पंजाब राज्याच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राजधानी: चंदीगड ही पंजाब राज्याची राजधानी आहे.