• २०२० सालच्या 'मानवी स्वातंत्र्य निर्देशांकात (Human Freedom Index)' १६२ देशांच्या यादीत भारत १११ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • २०१९ मध्ये सदर निर्देशांक क्रमवारीमध्ये भारत ९४ व्या स्थानावर होता.

  • न्यूझीलंड, स्वित्झर्लंड आणि हाँगकाँग या क्रमवारीत पहिल्या ३ अव्वल स्थानांवर विराजमान झाले आहेत.

  • अमेरिका आणि युनायटेड किंगडम सदर यादीत १७ व्या स्थानावर आहेत.

  • सीरिया या यादीत अंतिम स्थानावर राहिला आहे.

मानवी स्वातंत्र्य निर्देशांकाबाबत महत्त्वपूर्ण माहिती

  • निर्देशांक प्रकाशन: कॅनडामधील अमेरिकन थिंक टँक कॅटो इन्स्टिट्यूट (Cato Institute) आणि फ्रेझर इन्स्टिट्यूट (Fraser Institute) मिळून मानवी स्वातंत्र्य निर्देशांक प्रकाशित करतात.

  • निर्देशांक विचार: २००८ ते २०१८ पर्यंत देशांच्या क्रमवारीत वैयक्तिक, नागरी आणि आर्थिक स्वातंत्र्यांबाबतच्या एकूण ७६ निर्देशांकांचा यात विचार करण्यात आला आहे.