• हेन्ले अँड पार्टनर्समार्फत (Henley & Partners) जाहीर करण्यात आलेल्या हेन्ले पासपोर्ट निर्देशांक (Henley Passport Index) २०२१ मध्ये भारताने ८५ वे स्थान प्राप्त केले आहे.

ठळक मुद्दे

  • नुकत्याच जाहीर झालेल्या ताज्या अहवालानुसार २०२१ मध्ये हेन्ले पासपोर्ट निर्देशांकात ५८ व्हिसा गुणांसह भारत ११० देशांच्या क्रमवारीमध्ये ८५ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

  • जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून सलग तिसर्‍या वर्षी जपान पुन्हा एकदा अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

  • जपानी नागरिक तब्बल १९१ देशांमध्ये व्हिसा-रहित प्रवास करू शकतात.

  • सदर क्रमवारीत सिंगापूर दुसर्‍या स्थानावर तर दक्षिण कोरिया आणि जर्मनी संयुक्तपणे तिसर्‍या स्थानावर विराजमान झाले आहेत.

  • सिरिया, इराक आणि अफगाणिस्तान हे सर्वात वाईट पासपोर्ट असणारे देश ठरले आहेत.