• कोविड-१९ मुळे शाळा आणि महाविद्यालयांवर बंदी घातलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांकरिता घरीच आरोग्य तंदुरुस्तीसाठी ‘हेल्दी बॉडी, हेल्दी माईंड (Healthy Body, Healthy Mind)’ तंदुरुस्ती अभियान दिल्ली सरकारमार्फत सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • 'Healthy Body, Healthy Mind' या मोहीमेचा एक भाग म्हणून एक YouTube चॅनेल सुरू करण्यात आले आहे.

  • दर बुधवारी या चॅनेल वर एक व्हिडिओ अपलोड करण्यात येतो.

  • ज्याद्वारे विद्यार्थी तंदुरुस्ती राखण्यासाठी आठवड्यात सराव करतील आणि त्यादरम्यान शारीरिक हालचाली होऊ शकतील अशी अपेक्षा आहे.

दिल्लीबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: अरविंद केजरीवाल सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत.

  • राज्यपाल: अनिल बैजल सध्या दिल्लीचे राज्यपाल आहेत.

  • राजधानी म्हणून निर्मिती: १९११ साली दिल्लीला राजधानीचा दर्जा प्रदान करण्यात आला होता.

  • केंद्र शासित प्रदेश म्हणून निर्मिती: १९५६ साली दिल्लीला केंद्र शासित प्रदेश म्हणून दर्जा प्राप्त झाला होता.

  • राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणून निर्मिती: १ फेब्रुवारी १९९२ पासून दिल्लीला राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणून दर्जा प्रदान करण्यात आला होता.