• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी संपूर्ण केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीरसाठी ‘सेहत (SEHAT)’ नावाच्या आरोग्य विमा योजनेचे अनावरण करणार आहेत.

ठळक मुद्दे

  • आयुष्मान भारत योजनेंतर्गत समाविष्ट न करण्यात आलेली उर्वरित १ कोटी लोकसंख्या सदर योजनेत येणार आहे.

  • आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना (PM Jan Arogya Yojana - PMJAY) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच प्रदान करण्यात आले आहे.

  • PMJAY योजनेंतर्गत जम्मू-कश्मीरमध्ये ३० लाख लोकांचा समावेश आहे.