• हरित पथ (Harit Path) या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्व वृक्षारोपण प्रकल्पांतर्गत प्रत्येक वनस्पतीचे स्थान, वाढ, प्रजाती तपशील, देखभाल कार्ये, लक्ष आणि त्याच्या प्रत्येक क्षेत्रातील भागाचे निरीक्षण करणे हे आहे.

ठळक मुद्दे

  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India - NHAI) मार्फत 'हरित पथ (Harit Path)' नावाचे मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे.

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले आहे.

'हरित पथ (Harit Path)' मोबाईल अ‍ॅपबाबत महत्वपूर्ण माहिती

  • सदर मोबाईल अ‍ॅपद्वारे झाडांच्या वाढीचा व आरोग्याचा मागोवा घेण्यात येईल.

  • हरित पथ अ‍ॅपच्या अनावरणामुळे देशभरात हरित हायवे तयार होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) बाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९९५ साली NHAI ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NHAI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे अध्यक्ष: सुखबीरसिंग संधू हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • उद्दिष्ट: राष्ट्रीय महामार्गांचा विकास व देखभाल करणे हे NHAI चे महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे.

  • ब्रीदवाक्य: 'Not just Roads, building a Nation' हे NHAI चे ब्रीदवाक्य आहे.