-
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामार्फत नुकतेच ‘हर घर पानी, हर घर सफाई’ नावाच्या अभियानाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सर्व ग्रामीण घरांमध्ये १०० टक्के पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून सदर अभियान सुरू करण्यात येणार आहे.
-
सदर योजनेसाठी जागतिक बँक, भारत सरकारचे जल जीवन मिशन, नाबार्ड तसेच राज्य अर्थसंकल्प इ. द्वारे अर्थसहाय्य करण्यात येत आहे.
पंजाब राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: व्ही. पी. सिंग बदनोरे हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: अमरिंदर सिंग हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राजधानीचे शहर: चंदिगढ हे पंजाबच्या राजधानीचे शहर आहे.