• देशभरातील एकंदरीत आनंद मोजण्याच्या उद्देशपूर्तीसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेला पहिला 'भारतीय आनंदी अहवाल (India Happiness Report) २०२०' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • लोकांच्या आनंदात कशाचा अंतर्भाव होतो, कोविड-१९ चा आनंदावर होणारा परिणाम आणि विचारशील नेत्यांकडून प्राप्त करण्यात आलेले विचार यांच्या सकल मिश्रणातून हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

  • प्राध्यापक राजेश के पिल्लनिया यांनी मार्च ते जुलै २०२० दरम्यान केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणावर हा अहवाल आधारित आहे.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून आनंद क्रमवारी

  • मिझोरम

  • पंजाब

  • अंदमान निकोबार बेटे

मोठ्या राज्यांमध्ये आनंद क्रमवारी

  • पंजाब

  • गुजरात

  • तेलंगणा

लहान राज्यांमध्ये आनंद क्रमवारी

  • मिझोरम

  • सिक्कीम

  • अरुणाचल प्रदेश

केंद्रशासित प्रदेशांमध्ये आनंद क्रमवारी

  • अंदमान निकोबार बेटे

  • पुदुचेरी

  • लक्षद्वीप