• गुजरातमध्ये पहिल्यांदाच समुद्री विमान सेवा ३१ ऑक्टोबर २०२० पासून सुरू केली जाणार आहे. समुद्री विमान सेवा अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट ते गुजरातमधील केवडीयामधील स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत (Statue of Unity) हवाई जोडणी देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्पाइसजेट एअरलाईनमार्फत (Spicejet Airline) सागरी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

  • राज्यात सागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी गुजरात सरकारने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय (Union Ministry of Civil Aviation - MoCA) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India - AAI) यांच्यासमवेत त्रिपक्षीय करार केला आहे.

गुजरात राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: विजयभाई आर. रुपाणी हे सध्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यपाल: आचार्य देव व्रत हे सध्या गुजरातच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातचा देशात ५ वा क्रमांक लागतो.