• माजी क्रिकेटपटू, प्रशासक आणि क्रीडा खेळपट्टी समीक्षक म्हणून प्रसिद्ध असणारे गोपालस्वामी अय्यंगर कस्तुरीरंगन यांचे दुःखद निधन झाले.

ठळक मुद्दे

  • कस्तुरीरंगन यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३० रोजी तमिळनाडूमधील चेन्नई येथे झाला होता.

  • १९४८-४९ च्या मोसमात त्यांनी रणजी करंडकात म्हैसूरचे प्रतिनिधित्व केले होते.

  • त्यांनी १९६२-६३ च्या हंगामानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

  • कस्तुरीरंगन हे वेगवान गोलंदाज म्हणून संघात कार्यरत होते.

  • बीसीसीआयच्या (BCCI) मैदान आणि खेळपट्टी समितीचे अध्यक्ष तसेच कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे (Karnataka State Cricket Association - KSCA) उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.