• आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्थेच्या (International Union for Conservation of Nature - IUCN) आशियाई प्रादेशिक कार्यालयामार्फत पॉल सेन त्वा यांना आशिया खंडातील 'गोल्डमन पर्यावरण पुरस्कार (Goldman Environmental Prize) २०२०' प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • कारेनमधील लोकांच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनास प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांसाठी त्यांना सदर पुरस्कार देण्यात आला आहे.

पॉल सेन त्वा यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • २००१ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या 'कारेन पर्यावरण आणि सामाजिक कृती नेटवर्कचे (Karen Environmental and Social Action Network - KESAN)' पॉल हे सह-संस्थापक आहेत.

  • पॉल आणि KESAN मधील त्यांच्या पथकाने म्यानमार आणि थायलंडच्या सीमेवर साल्वीन पीस पार्क स्थापन करण्यात कारेन स्वदेशी समुदायाचे समर्थन केले आहे.

गोल्डमन पर्यावरण पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती

  • सदर पुरस्कार हा जगातील भौगोलिक क्षेत्रांपैकी तळागाळातील पर्यावरण कार्यकर्त्यांना वार्षिक पुरस्कार स्वरूपात प्रदान करण्यात येतो.

IUCN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IUCN म्हणजेच International Union for Conservation of Nature अर्थात आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्था होय.

  • सध्याचे संचालक: ब्रुनो ओबर्ले हे सध्या IUCN चे संचालक आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: ग्लॅण्ड, स्वित्झर्लंड हे IUCN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थापक: ज्युलियन हक्सले हे IUCN चे संस्थापक आहेत.

  • स्थापना वर्ष: ५ ऑक्टोबर १९४८ रोजी IUCN ची स्थापना करण्यात आली होती.