• 'स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Steel Authority of India Limited - SAIL)' ला २०२० सालाचा प्रतिष्ठीत 'गोल्डन पिकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार (Golden Peacock Environment Management Award)' प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • SAIL ही कंपनी सलग २ वर्षे या पुरस्काराची विजेती ठरली आहे

  • सदर पुरस्काराच्या माध्यमातून शाश्वत आणि पर्यावरण पूरक स्टील तयार करण्याच्या प्रयत्नांची साक्ष प्रत्ययास येते.

SAIL बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: SAIL म्हणजेच Steel Authority of India Limited अर्थात स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड होय.

  • सध्याचे अध्यक्ष: अनिल कुमार चौधरी हे सध्या SAIL चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे SAIL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९५४ साली SAIL ची स्थापना करण्यात आली होती.