• ब्रॅण्ड फायनान्सच्या (Brand Finance) अहवालानुसार जागतिक स्तरावर सर्वाधिक मूल्यवान आयटी सर्व्हिस ब्रँडमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services - TCS) ही अ‍ॅक्सेन्चर (Accenture) आणि आयबीएम (IBM) या कंपन्यांनंतर तिसर्‍या क्रमांकावर विराजमान झाली आहे.

ठळक मुद्दे

  • सध्या तिसऱ्या क्रमांकावरील TCS आणि IBM यांच्यामध्ये जास्त अंतर नाही.

  • अ‍ॅक्सेन्चरने जगातील सर्वात मूल्यवान आणि सर्वात मजबूत आयटी सर्व्हिस ब्रँडचे विजेतेपद कायम राखले तर IBM ब्रँड मूल्यासह दुसर्‍या स्थानावर कायम आहे.

  • टीसीएस (३), इन्फोसिस (४), एचसीएल (७) आणि विप्रो (९) या ४ भारतीय IT सेवा कंपन्यांनी जागतिक स्तरावरील पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे.

TCS बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: TCS म्हणजेच अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस होय.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी: राजेश गोपीनाथन हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • अध्यक्ष: नटराजन चंद्रशेखरन हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष : १९६८ साली TCS ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे TCS च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.