-
सिंगापूर युनिव्हर्सिटी फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाईन (Singapore University for Technology and Design - SUTD) च्या सहकार्याने व्यवस्थापन विकास संस्थेमार्फत (Institute for Management Development - IMD) स्मार्ट सिटी निर्देशांक २०२० जाहीर करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
२०२० सालच्या स्मार्ट सिटी निर्देशांकासाठी १०९ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
-
सदर निर्देशांकात सिंगापूर शहराने क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
-
हेलसिंकी आणि झ्यूरिच ही शहरे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.
-
२०२० च्या स्मार्ट सिटी निर्देशांकामध्ये हैदराबाद हे ८५ व्या क्रमांकावर असलेले अव्वल भारतीय शहर ठरले आहे.
निर्देशांकातील स्थानानुसार भारतीय शहरांची यादी
-
८५. हैदराबाद
-
८६. नवी दिल्ली
-
९३. मुंबई
-
९५. बंगळुरु