• जागतिक नाविन्यता निर्देशांकामध्ये (Global Innovation Index - GII) भारत प्रथमच पहिल्या ५० देशांच्या गटात सामील झाला आहे. भारताने १३१ देशांच्या यादीत ४ स्थानांची सुधारणा करत ४८ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

ठळक मुद्दे

  • माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (Information and Communication Technology - ICT) सेवा निर्यात, सरकारी ऑनलाईन सेवा, विज्ञान व अभियांत्रिकीमधील एकूण पदवीधर संख्या आणि संशोधन व विकास आधारित जागतिक कंपन्या यांसारख्या निर्देशांकांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

  • सदर निर्देशांकाची थीम 'Who will Finance Innovation?' अशी होती.

  • स्वित्झर्लंड, स्वीडन, अमेरिका, ब्रिटन आणि नेदरलँड्स हे देश या क्रमवारीमध्ये आघाडीवर आहेत आणि पहिल्या ५ स्थानांवर उच्च उत्पन्न असलेल्या देशांचे वर्चस्व राहिलेले आहे.

  • जागतिक नाविन्यता निर्देशांकाची (Global Innovation Index - GII) २०२० ची १३ वी आवृत्ती जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना (World Intellectual Property Organization - WIPO), कॉर्नेल विद्यापीठ आणि इन्सेड बिझनेस स्कूल (INSEAD Business School) यांनी संयुक्तपणे जाहीर केली आहे.

जागतिक नाविन्यता निर्देशांक २०२० क्रमवारीमधील अव्वल ५ देश

  • स्वित्झर्लंड (६६.०८ गुण)

  • स्वीडन (६२.४७ गुण)

  • युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (६०.५६ गुण)

  • युनायटेड किंगडम (५९.७८ गुण)

  • नेदरलँड्स (५८.७६ गुण)

  • ४८ वा भारत (३५.५९ गुण)

जागतिक नाविन्यता निर्देशांकाबाबत (Global Innovation Index - GII) महत्वपूर्ण माहिती

  • जगभरातील १३१ देश आणि अर्थव्यवस्थांच्या नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल हा निर्देशांक तपशीलवार माहिती प्रदान करतो.

  • राजकीय वातावरण, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि व्यवसायातील सुसंस्कृतपणासह नाविन्यपूर्णतेच्या ८० निर्देशांकांचे विस्तृत दृष्टीकोनातून अन्वेषण यामध्ये करण्यात येते.