-
जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index - GHI) २०२० मध्ये भारत १०७ देशांच्या क्रमवारीमध्ये ९४ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
जी. एच. आय. स्केलमध्ये (GHI scale) २७.२ गुणांसह भारताची 'गंभीर' श्रेणीमध्ये गणना करण्यात आली आहे.
-
गत वर्षी ११७ देशांच्या क्रमवारीमध्ये भारत १०२ व्या स्थानावर विराजमान झाला होता..
-
बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तानदेखील ‘गंभीर’ प्रकारात गणले गेले आहेत परंतु त्यांचे स्थान भारतापेक्षा वरचे आहे.
-
सदर क्रमवारीमध्ये बांगलादेश ७५ व्या स्थानावर, म्यानमार ७८ व्या आणि पाकिस्तान ८८ व्या स्थानावर आहेत.
-
क्रमवारीमध्ये ७३ व्या क्रमांकावर असलेला नेपाळ आणि ६४ व्या क्रमांकावर असलेला श्रीलंका यांना ‘मध्यम’ भूक प्रकारात गणण्यात आले आहे.