-
बॉन-आधारित पर्यावरणविषयक विचार गट जर्मनवॉचमार्फत (Germanwatch) प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक हवामान जोखीम निर्देशांक (Global Climate Risk Index) २०२१ मध्ये भारत ७ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
२०१९ मध्ये हवामान बदलाच्या बाबतीत भारत ७ व्या क्रमांकाचा सर्वाधिक फटका बसलेला देश ठरला होता.
-
जागतिक हवामान जोखीम निर्देशांक २०२१ ही या वार्षिक अहवालाची १६ वी आवृत्ती आहे.
जागतिक हवामान जोखीम निर्देशांकाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
सदर निर्देशांक हवामानाबाबतची जोखीम आणि असुरक्षा यांचे स्तर दर्शविण्याचे कार्य करतो.
-
भविष्यात अधिक गंभीर घटनांना सामोरे जाण्यास तयार राहण्यासाठी चेतावणी म्हणून हा निर्देशांक सहाय्यभूत ठरतो.