• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत बिहारमध्ये ९ महामार्ग प्रकल्प आणि ऑप्टिकल फायबर इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • 'घर तक फायबर' या योजनेंतर्गत ऑप्टिकल फायबर सेवा पुरविण्याचे कार्य केले जात आहे.

  • सामान्य सेवा केंद्राच्या (Common Service Centre) संयुक्त प्रयत्नांसह या सेवा आमलात आणल्या जाणार आहेत.

  • सदर प्रकल्प हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Electronics and Information Technology) योजनेंतर्गत राबविला जाणार आहे.

  • या प्रकल्पाद्वारे राज्यातील जवळपास ४६००० खेड्यांना जोडण्याचे कार्य संपन्न होणार आहे ज्यामुळे डिजीटल क्रांती बिहारच्या अगदी सर्वसामान्य स्तरापर्यंत पोहोचू शकेल.

महत्वपूर्ण माहिती

  • बिहारचे मुख्यमंत्री: नितीशकुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत.

  • बिहारचे राज्यपाल: फागु चौहान हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत.

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय राज्यमंत्री: संजय शामराव धोत्रे हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.