• मध्य प्रदेश सरकारमार्फत ‘गंदगी भारत छोडो’ नावाची १५ दिवसांची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर अभियानांतर्गत जवळपास ७२०० वस्त्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

  • मध्य प्रदेश राज्यातील ३७८ नागरी संस्थांमधील सुमारे ३५ लाख लोकांनी या मोहिमेमध्ये सहभाग दर्शविला.

मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्यनिर्मिती: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.

  • विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे