• २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधी दरम्यान ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (International Film Festival of India -IFFI) आयोजन गोवा येथे करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • कोविड-१९ मुळे सदर चित्रपट महोत्सव नाट्य प्रदर्शनासह अधिकृत डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

IFFI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IFFI म्हणजेच International Film Festival of India अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होय.

  • स्थापना वर्ष: २४ जानेवारी १९५२ रोजी IFFI ची स्थापना झाली होती.

  • प्रदान करण्यात येणारा पुरस्कार: IFFI मार्फत Golden Peacock Award हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

गोवा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्य स्थापना वर्ष: ३० मे १९८७ साली गोवा राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: पणजी ही गोव्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी हे सध्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: प्रमोद सावंत हे सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत.