-
फॉर्च्युन मासिकामार्फत जाहीर करण्यात आलेल्या २०२१ सालच्या जगातील ५० महान नेत्यांच्या यादीमध्ये न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न अव्वल स्थानावर विराजमान झाल्या आहेत.
ठळक मुद्दे
-
२०२१ साठीची ही 'जगातील ५० महान नेत्यांची' यादी ही वार्षिक यादीची ८ वी आवृत्ती आहे.
-
भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India - SII) मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला पहिल्या १० जणांपैकी एकमेव भारतीय आहेत. ते १० व्या स्थानावर विराजमान झाले आहेत.
अव्वल १० नेत्यांची यादी
-
जॅकिंडा आर्डर्न (पंतप्रधान, न्यूझीलंड)
-
एमआरएनए पायोनियर्स (mRNA Pioneers)
-
डॅन शुल्मन (मुख्य कार्यकारी अधिकारी, पेपाल)
-
जॉन नेकेनसॉन्ग [संचालक, रोग नियंत्रण व प्रतिबंधक आफ्रिका केंद्र (Africa Centres for Disease Control and Prevention)]
-
अॅडम सिल्व्हर, मिशेल रॉबर्ट्स, ख्रिस पॉल, एनबीए बचावकर्ते (NBA Rescuers)
-
जेसिका टॅन (संस्थापक, Ping An Group)
-
जस्टिन वेल्बी
-
स्टेसी अब्राम (संस्थापक, फेअर फाईट)
-
रेशोर्ना फिट्झपॅट्रिक
-
अदार पूनावाला (मुख्य कार्यकारी अधिकारी, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया)