-
फोर्ब्समार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जागतिक सर्वोत्कृष्ट नियोक्ता (World’s Best Employer) २०२०’ अंतर्गत भारतीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांच्या (PSUs) यादीमध्ये 'राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित (National Thermal Power Corporation Limited - NTPC)' ने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
ठळक मुद्दे
-
NTPC मार्फत विचारपूर्वक रचना आणि जोरदारपणे अंमलात आणल्या जाणार्या पद्धतींमध्ये सर्वोत्तम उत्तेजन देण्याच्या प्रतिबद्धतेची साक्ष देण्यात आली आहे.
-
संस्थेमधील हजारो कामगारांना व्यावसायिक क्षेत्राच्या पलिकडे वृद्धिंगत होण्यास आणि विचार करण्यास याची मदत झाली आहे.
NTPC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NTPC म्हणजेच National Thermal Power Corporation Limited अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित होय.
-
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: गुरदीप सिंग हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९७५ साली NTPC ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NTPC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.