-
अमेरिकन रिअॅलिटी टीव्ही स्टार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या काइली जेनरने (Kylie Jenner) फोर्ब्सच्या २०२० च्या 'सर्वाधिक मानधन घेणार्या सेलिब्रिटींच्या यादीत (Forbes’ list of highest-paid celebrities)' अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
ठळक मुद्दे
-
२०२० मध्ये काइली जेनरसह जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या तार्यांनी जवळपास ६.१ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.
-
आर्थिक तज्ञांनी विश्लेषणानुसार काइलीने तिच्या सौंदर्य ब्रँडचा बहुतांश हिस्सा 'कोटी इंक (Coty Inc)'ला विकल्यानंतर तिची कमाई जवळपास ५९० दशलक्ष डॉलर्स इतकी दर्शवली आहे.
-
प्रसिद्ध अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) हा यादीत १७० दशलक्ष डॉलर्स कमाईसह दुसर्या स्थानावर विराजमान झाला आहे.
-
टायलर पेरी, हॉवर्ड स्टर्न आणि ड्वेन जॉनसन यांच्या व्यतिरिक्त रॉजर फेडरर, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेमार आणि लेब्रोन जेम्स यासारख्या दिग्गजांनी पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे.