-
'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited - RIL)' अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी २०२० सालच्या फोर्ब्स इंडिया (Forbes India) श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
ठळक मुद्दे
-
सलग १३ व्या वर्षी मुकेश अंबानी यांनी फोर्ब्स इंडियाच्या यादीमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपले स्थान अबाधित ठेवले आहे.
-
सध्या त्यांची निव्वळ संपत्ती ८८.७ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.
-
मागील वर्षाच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये जवळपास ७३% इतकी प्रचंड वाढ झाली आहे.
-
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे २५.२ अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.
-
२०.४ अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह शिव नादर यांनी या यादीमध्ये तिसरा क्रमांक मिळविला आहे.