• फोर्ब्समार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या २०२० सालच्या जगातील १०० सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत (Forbes १०० most powerful women in the world) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ४१ वे स्थान प्राप्त केले आहे.

ठळक मुद्दे

  • निर्मला सीतारमण २०१९ मध्ये ३४ व्या तर २०२० मध्ये ४१ व्या स्थानावर विराजमान होताना सदर यादीत दुसर्‍यांदा स्थान मिळविण्यात यशस्वी झाल्या आहेत.

  • बायोकॉन लिमिटेडच्या (Biocon Limited) अध्यक्षा किरण मझुमदार शॉ या यादीत ६८ व्या क्रमांकावर विराजमान आहेत.

  • सदर यादीत अमेरिकेच्या नवनियुक्त उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

क्रमवारीनुसार सामर्थ्यवान महिला

  • १. अँजेला मर्केल (चान्सलर, जर्मनी)

  • २. क्रिस्टीन लगार्ड (अध्यक्ष, युरोपियन सेंट्रल बँक)

  • ३. कमला हॅरिस (उपाध्यक्षा, युनायटेड स्टेट्स)

  • ४. उर्सुला वॉन डर लेन (अध्यक्ष, युरोपियन कमिशन, युरोपियन युनियन)

  • ५. मेलिंडा गेट्स (सह - अध्यक्ष, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन)

  • ४१. निर्मला सीतारमण (अर्थमंत्री, भारत)

  • ६८. किरण मजुमदार-शॉ (संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, बायोकॉन लि.)