-
UN महिला आणि केरळ सरकार यांच्या दरम्यान भारतातील पहिले लिंग माहिती केंद्र (Gender Data Hub) स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
केरळ राज्याचे मुख्यमंत्री श्री. पिनाराई विजयन यांच्या उपस्थितीत या संदर्भात सामंजस्य करार संपन्न झाला.
-
सामंजस्य करारात नमूद तरतुदींनुसार जेंडर पार्क येथे लिंग माहिती केंद्राची स्थापना करणे, लिंग समानता या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेची दुसरी आवृत्ती सुरू करणे तसेच लिंग समानता आणि महिला सशक्तीकरण यांच्याबाबत सहभाग वाढविणे या सहकार्याच्या ३ प्रमुख बाबी आहेत.
लिंग माहिती केंद्राबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अधिक संवेदनशील डेटा संकलित करून त्याचे विश्लेषण आणि उपयोजन करणे तसेच केंद्र-स्तरावरील महिलांच्या हक्कांच्या पद्धतीने धोरण तयार करणे यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
-
केरळच्या सामाजिक न्याय विभागामार्फत स्थापिल्या जाणाऱ्या या जेंडर पार्कच्या माध्यमातून लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण बाबतच्या विविध अग्रगण्य उपक्रमांना व्यापक आणि सखोल स्वरूप धारण होईल अशी अपेक्षा आहे.
केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.
-
राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.
-
मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.