• भारतीय टपाल खात्यामार्फत पंचतारांकित गाव योजना (Five Star Villages Scheme) सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजना भारताच्या ग्रामीण भागातील टपाल योजनांचे सार्वत्रिक सामिलीकरण सुनिश्चित करते.

  • पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ही योजना राबविली जाईल.

  • २०२०-२१ दरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील ५० गावे यामध्ये समाविष्ट करण्यात येतील.

  • लोक जागृतीमधील व दुर्गम खेडोपाड्यात टपाल उत्पादने व सेवा पोहोचविणे यामधील अंतर कमी करणे हे सदर योजनेचे उद्दिष्ट आहे.

  • योजनेची अंमलबजावणी ५ ग्रामीण डाक सेवकांच्या पथकाद्वारे होईल अशी अपेक्षा आहे.