-
अंदमान आणि निकोबार बेटे देशातील पहिले कोविड - १९ मुक्त राज्य किंवा केंद्र शासित प्रदेश बनली आहेत.
ठळक मुद्दे
-
आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळाद्वारे अंदमान आणि निकोबार बेटांवरील शेवटचे ४ संसर्गग्रस्त लोक बरे झाले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
-
सदर केंद्रशासित प्रदेशात कोरोनामुळे एकूण ४९३२ रुग्ण तसेच ६२ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
अंदमान आणि निकोबार बाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी अंदमान आणि निकोबारची स्थापना करण्यात आली होती.
-
राजधानी: पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे.
-
लेफ्टनंट गव्हर्नर: अॅडमिरल (निवृत्त) देवेंद्रकुमार जोशी हे सध्या लेफ्टनंट गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.