• ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील नळाला पाणीपुरवठा उपलब्ध करून दिल्याने गोवा हे देशातील पहिले 'हर घर जल' राज्य बनले असल्याचे जलशक्ती मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • राज्यातील १९१ ग्रामपंचायतींमधील २ लाख ३० हजार ग्रामीण घरांना नळपाणी जोडणी देण्यात आली आहे.

  • इतर राज्यांसाठी अनुकरणीय स्वरूपाचे कार्य केल्याची आणि प्रत्येक ग्रामीण घराला नळ जोडणी मिळवून देण्याची उल्लेखनीय कामगिरी गोवा राज्याने केली आहे.

गोवा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९८७ साली गोवा राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: पणजी ही गोवा राज्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: प्रमोद सावंत सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.