-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) ८-१२ फेब्रुवारी २०२१ रोजी आर्थिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आर्थिक साक्षरता सप्ताहाचे (Financial Literacy Week - FLW) अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
२०१६ पासून देशभरात दरवर्षी RBI एका विशिष्ट थीमवर आर्थिक शिक्षण संदेशांचा प्रसार करण्यासाठी आर्थिक साक्षरता सप्ताह आयोजित करते.
-
'औपचारिक संस्थांकडून क्रेडिट आणि क्रेडिट शिस्त (Credit Discipline and Credit from Formal Institutions)' ही २०२१ सालच्या आर्थिक साक्षरता सप्ताहाची थीम आहे.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.