• राजस्थानच्या 'फॅमिलीअल फॉरेस्ट्री (Familial Forestry)' या पर्यावरण संघटनेला नुकताच २०२१ सालचा 'लँड फॉर लाईफ अ‍ॅवॉर्ड (Land for Life Award)' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरणाविरोधी करार (UN Convention to Combat Desertification - UNCCD)' दर २ वर्षांनी 'लँड फॉर लाईफ अ‍ॅवॉर्ड' चे आयोजन करते.

  • 'स्वस्थ जमीन, स्वस्थ जीवन (Healthy Land, Healthy Lives)' ही २०२१ सालच्या पुरस्काराची थीम आहे.

  • सदर पुरस्काराची सुरूवात २०११ मध्ये करण्यात आली होती.

  • जमीन संवर्धन तसेच जीर्णोद्धार या संदर्भातील हा जगातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.