• केरळ सरकारचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान एझुथचन पुरस्करम (Ezhuthachan Puraskaram) साठी यावर्षी प्रख्यात मल्याळम लेखक पॉल जकारिया यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • गेल्या ५ दशकांत जकारिया यांच्या मल्याळम साहित्यातील योगदानासाठी निवड करण्यात आली आहे.

  • केरळ साहित्य अकादमीचे अध्यक्ष वैशाखान यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यांच्या मंडळामार्फत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

  • 'सलाम अमेरिका, ओरिडाथ, आर्करीअम, भास्करा पेटेलरम एन्टी जीवथावम' या त्यांच्या विविध साहित्यिक कलाकृतींपैकी काही निवडक स्वरूपाच्या आहेत.

जकारिया यांना मिळालेले पुरस्कार

  • १९७९: केरळ साहित्य अकादमी पुरस्कार

  • २००४: केंद्र साहित्य अकादमी पुरस्कार