• मध्य प्रदेश राज्याचे नगरविकास व गृहनिर्माण मंत्री भूपेंद्र सिंह यांनी १ ते १५ ऑगस्ट दरम्यान 'एक मास्क-अनेक जिंदगी' या जनजागृती मोहीमेचे अनावरण केले. कोविड-१९ पासून होणा-या संसर्गापासून बचाव म्हणून ही योजना मास्क घालण्याविषयी जागरूकता निर्माण करेल अशी अपेक्षा आहे.

ठळक मुद्दे

  • सदर मोहिमेअंतर्गत, मास्क बँका स्थापन केल्या गेल्या. शक्य त्या ठिकाणी लोक मास्क दान करू शकतात जे की गरीब लोकांना विनामूल्य वाटप केले जाईल

  • प्रत्येक जिल्हा / शहरी संस्थांमध्ये नागरिक स्वयंसेवी संस्थांमार्फत मास्क दान करू शकतात

  • देणगी ही मास्क किंवा फंडांच्या स्वरूपात देखील असू शकते जी स्वयंसहाय्यता गटांद्वारे मास्क शिवण्याच्या कामासाठी वापरली जाईल

  • घोषणा, पोस्टर्स आणि पत्रकांद्वारे जनजागृती करण्याचे कार्य पार पाडले जाईल

मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत

  • राज्यनिर्मिती: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती

  • राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे

  • विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे