• बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange - BSE) लिमिटेडमार्फत BSE इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या सहाय्याने कृषी वस्तूंसाठी 'BSE ई-अ‍ॅग्रीकल्चरल मार्केट्स लिमिटेड (BSE E-Agricultural Markets Ltd - BEAM)' इलेक्ट्रॉनिक स्पॉट प्लॅटफॉर्म बाजारात आणण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय शेती बाजाराची स्पर्धात्मकता वाढविणे हा सदर मंचाचा हेतू आहे.

  • वित्तीय बाजारपेठ, बाजार तंत्रज्ञानाबाबत BSE ची मजबुती वाढविणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

BSE बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: BSE म्हणजेच Bombay Stock Exchange अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज होय.

  • स्थापना वर्ष: १८७५ साली BSE ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे BSE च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: आशिष कुमार चौहान हे सध्या या पदावर आहेत.