• रेल्वे सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेमार्फत ड्रोन-आधारित देखरेख ठेवणारी यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून (Railway Protection Force - RPF) रेल्वे सुरक्षेच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात ड्रोन वापरण्याची कृती योजना आखण्याचे ठरविले आहे.

ठळक मुद्दे

  • ड्रोन तैनातीच्या माध्यमातून हेतू बल प्रदान करणे आणि तैनात केलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांची प्रभावितता वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट आखण्यात आले आहे.

  • मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने स्टेशन परिसर, रेल्वे ट्रॅक विभाग, यार्ड तसेच कार्यशाळा यासारख्या महत्वाच्या भागात सुरक्षा व देखरेखीसाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली आहे.

भारतीय रेल्वेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: ८ मे १८४५ रोजी भारतीय रेल्वेची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय रेल्वेचे मुख्यालय आहे.

  • रेल्वेमंत्री: पीयूष गोयल हे सध्या रेल्वेमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

  • रेल्वे राज्यमंत्री: सुरेश अंगडी हे सध्या रेल्वे राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

  • रेल्वे बोर्ड अध्यक्ष: विनोदकुमार यादव हे सध्या रेल्वे बोर्ड अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

  • विभागणी: १८ झोनमध्ये भारतीय रेल्वेची विभागणी करण्यात आली आहे.