• राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान अकादमीमार्फत (National Academy of Medical Sciences) डॉ. सतीश मिश्रा यांना 'डॉ. तुलसी दास चुघ पुरस्कार (Dr. Tulsi Das Chugh Award) २०२०' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • मलेरिया परजीवीच्या जीवनचक्रावरील संशोधनाच्या कार्याबद्दल त्याला सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  • त्यांनी 'सिक्रेटेड प्रोटीन विथ अ‍ॅल्टर्ड थ्रोम्बोस्पॉन्डिन रीपीट (Secreted Protein with Altered Thrombospondin Repeat - SPATR)' या कार्यावर आपले लक्ष केंद्रित केले होते.

उल्लेखनीय कामगिरी

  • २०१९ मध्ये राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान अकादमीच्या (National Academy of Medical Sciences) सदस्यपदी निवड

  • २०१८ मध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेमार्फत (Indian Council of Medical Research - ICMR) शकुंतला अमीर चंद पुरस्कार प्राप्त

  • २०१३ मध्ये भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत रामलिंगस्वामी फेलोशिप प्राप्त