-
२०२० सालचा डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार (Dr. Narendra Dabholkar Memorial Award) द्रविड़ कझगमचे अध्यक्ष के. वीरमणी यांना प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तर्कवादी श्री. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
-
अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनमार्फत दाभोळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सदर पुरस्कार स्थापन करण्यात आला होता.
-
१ लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
-
श्री. के. वीरमणी यांनी आपले आयुष्य बुद्धीप्रामाण्यवादाच्या (rationalism) प्रसारासाठी समर्पित करत सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे बहुमोल कार्य केले आहे.