• अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. इशर जज अहलुवालिया यांचे नुकतेच निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांनी दिल्ली येथे स्थित 'आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांवर संशोधन करण्यासाठीच्या भारतीय परिषदेच्या (Indian Council for Research on International Economic Relations - ICRIER)' संचालक पदाचा पदभार सांभाळला आहे. 

  • यानंतर त्यांनी ICRIER येथे अध्यक्ष पदाचा १५ वर्षे कार्यभार सांभाळला आहे. 

  • त्यांच्या कार्यकाळात ICRIER ची गणना जागतिक आघाडीच्या थिंक टँकमध्ये करण्यात आली होती.

पुरस्कार प्राप्त

  • शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या वैविध्यपूर्ण सेवांबद्दल त्यांना २००९ मध्ये भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.