-
गुजरात राज्य सरकारतर्फे ‘डिजीटल सेवा सेतू (Digital Seva Setu)’ नावाच्या कार्यक्रमाचे अनावरण करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
ग्रामीण भागात लोककल्याणाच्या उद्देशपूर्तीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग व्हावा याकरिता गुजरात राज्य सरकारने ‘डिजीटल सेवा सेतू’ हा कार्यक्रम जाहीर केला आहे.
-
सदर कार्यक्रम हा केंद्राच्या भारतनेट प्रकल्पांतर्गत (BharatNet Project) सुरू करण्यात आलेला आहे.
-
ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या माध्यमातून ग्रामपंचायतींची जोडणी करुन राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक कल्याण सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
गुजरात राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: विजयभाई आर. रुपाणी हे सध्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
राज्यपाल: आचार्य देव व्रत हे सध्या गुजरातच्या राज्यपाल पदावर आहेत.
-
स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातचा देशात ५ वा क्रमांक लागतो.