• बिहार राज्याला 'साथीच्या वर्गवारी (Pandemic Category)' मध्ये 'डिजीटल इंडिया पुरस्कार (Digital India award)'  २०२० चे विजेते म्हणून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • बिहार सरकारच्या पुढाकाराने कोविड - १९ च्या काळात लाभार्थ्यांना आर्थिक मदत त्यांच्या थेट खात्यात वर्ग करण्यात आली होती जी अत्यंत कौतुकास्पद बाब मानण्यात आली आहे.

  • कोविड - १९ साथीच्या काळामध्ये ई-गव्हर्नन्समधील (e-governance) वैशिष्ट्यपूर्ण बाबींसाठी केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या डिजीटल इंडिया पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.

बिहार राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: फागु चौहान हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत.

  • मुख्यमंत्री: नितीशकुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत.

  • स्थापना वर्ष: १९१२ साली बिहार राज्याची स्थापना करण्यात आली होती.

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १९५० साली बिहारला राज्य दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: पटना ही बिहारची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने बिहारचा देशात १२ वा क्रमांक लागतो.