-
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते जमीन व मालमत्ता यांच्या नोंदणीसाठी ‘धरणी (Dharani)’ नावाच्या वेब पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्य सरकार नोंदणी व उत्परिवर्तन आदि बाबींसह सर्व मालमत्तेचे व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे.
तेलंगणाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: के. चंद्रशेखर राव हे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: तामिळसाई सौंदाराजन हे सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती. २ जून हा 'तेलंगणा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.
-
राजधानीचे ठिकाण: हैद्राबाद हे तेलंगणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने तेलंगणा हे देशात ११ व्या स्थानावर विराजमान आहे.