• तिबेटी आध्यात्मिक गुरु दलाई लामा जर्मन पर्यावरण पत्रकार फ्रांझ ऑल्ट यांच्यासमवेत नोव्हेंबरमध्ये हवामान बदलांवर आधारित 'Our Only Home: A Climate Appeal to the World' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत.

पुस्तकाबद्दल ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकात दलाई लामा सध्याच्या जगात राजकीय निर्णय घेणाऱ्यांना हवामान बदलांच्या मुद्यावर असणारे अडथळे आणि अज्ञानाविरूद्ध लढा देण्यासाठी प्रबोधन करण्याबाबत लिहीतात.

  • भिन्न स्वरूपाच्या, अधिक हवामान अनुकूल जगासाठी उभे राहण्यासाठी आणि तरुण पिढीला त्यांचे भविष्य परत मिळवण्याचा हक्क ठासून सांगण्याची विनंती ते या पुस्तकाच्या माध्यमातून करतात. .

  • 'The Seed of Compassion: Lessons from the Life and Teachings of His Holiness the Dalai Lama' हे त्यांचे आत्मचरित्र आणि तत्वज्ञानावर आधारित पुस्तक आहे.