-
प्रशिक्षक म्हणून विख्यात असलेल्या वासुदेव जगन्नाथ परांजपे अर्थात वासू परांजपे यांच्यावर आधारित 'क्रिकेट द्रोणा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा २ सप्टेंबर २०२० रोजी पार पडणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकाचे लेखन वासुदेव जगन्नाथ परांजपे यांचे सुपुत्र आणि विद्यमान राष्ट्रीय निवडकर्ते म्हणून भूमिका बजावणाऱ्या जतीन परांजपे यांनी क्रिकेट पत्रकार आनंद वासू यांच्यासमवेत केले आहे.
-
पुस्तकाच्या प्रकाशनाचे कार्य पेंग्विन यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. .
-
सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांसारख्या महान क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीला आकार देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या परांजपे यांच्या कार्याबद्दल पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे.
-
सदर पुस्तकात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांनी लिहीलेल्या निबंधांचा समावेश केला गेला आहे.