• ट्रान्सपरंसी इंटरनॅशनलमार्फत (Transparency International) जाहीर करण्यात आलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (Corruption Perception Index - CPI) २०२० मध्ये १८० देशांच्या यादीमध्ये भारत ८६ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • २०१९ साली भारत ८० व्या स्थानावर विराजमान झाला होता.

  • २०२० सालाचा भारताचा CPI स्कोअर ४० आहे.

  • बुर्किना फासो, मोरोक्को, पूर्व तिमोर, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि टर्की यांच्यासह भारत संयुक्तपणे या स्थानावर आहे.

  • न्यूझीलंड आणि डेन्मार्क यांनी ८८ गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान धारण केले आहे.

  • सोमालिया आणि दक्षिण सुदान हे १२ गुणांसह सर्वात तळाच्या म्हणजेच १७९ व्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत.

CPI निर्देशांकाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • CPI म्हणजेच Corruption Perception Index अर्थात भ्रष्टाचार धारणा निर्देशांक होय.

  • तज्ज्ञांच्या मते CPI निर्देशांकात सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या ज्ञात पातळीनुसार १८० देश आणि प्रांत समाविष्ट आहेत.

  • सदर निर्देशांक हा '० ते १००' या स्केलनुसार दर्शविण्यात येतो ज्यामध्ये ० म्हणजे 'अत्यंत भ्रष्ट (Highly Corrupt)' असून १०० म्हणजे 'अत्यंत स्वच्छ (Very Clean)' आहे.

ट्रान्सपरंसी इंटरनॅशनलबाबत (Transparency International) महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालयाचे ठिकाण: बर्लिन, जर्मनी हे ट्रान्सपरंसी इंटरनॅशनलच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: डेलिया फेरेरा रुबिओ सध्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९९३ साली सदर संस्थेची स्थापना करण्यात आली होती.

  • संस्थेचा हेतू: भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई देणे तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध करणे या मुख्य हेतूंसाठी सदर संस्था कार्य करते.