-
आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या (International Solar Alliance - ISA) स्थापनेपासून प्रथमच ISA च्या तिसर्या सभेदरम्यान सौर पुरस्कार हे देश तसेच सौर ऊर्जेसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहेत.
पुरस्कार प्राप्त विजेत्यांची यादी
विश्वेश्वरय्या पुरस्कार
-
आशिया - पॅसिफिक क्षेत्रासाठी जपानला तसेच युरोप आणि इतर विभागांसाठी नेदरलँड्सला विश्वेश्वरय्या पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कल्पना चावला पुरस्कार
-
भारतातील IIT दिल्ली येथील डॉ. भीम सिंग आणि संयुक्त अरब अमिराती येथील दुबई विद्युत व पाणी प्राधिकरणातील डॉ. आयेशा अलनुईमी यांना कल्पना चावला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
दिवाकर पुरस्कार
-
अर्पन इन्स्टिट्यूट (हरियाणा) आणि आरुषि सोसायटी यांना दिवाकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ISA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ISA म्हणजेच International Solar Alliance अर्थात आंतरराष्ट्रीय सौर युती होय.
-
स्थापना वर्ष: २०१५ मध्ये ISA ची स्थापना झाली होती.
-
स्थापनेचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स येथे आंतरराष्ट्रीय सौर युतीची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: गुरुग्राम, हरियाणा हे ISA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
महासंचालक: उपेंद्र त्रिपाठी हे सध्या महासंचालक पदावर विराजमान आहेत.