• केरळ राज्याचे मुख्यमंत्री श्री. पिनाराई विजयन यांच्यामार्फत राज्य सार्वजनिक शिक्षण क्षेत्र पूर्णपणे डिजीटल म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सार्वजनिक शाळांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचे वर्ग समाविष्ट असणारे केरळ हे देशातील पहिले राज्य बनले आहे.

  • केरळ पायाभूत सुविधा गुंतवणूक निधी बोर्डच्या (Kerala Infrastructure Investment Fund Board - KIIFB) आर्थिक सहाय्याने शिक्षणासाठी केरळ राज्य पायाभूत सुविधा व तंत्रज्ञानाद्वारे (Kerala Infrastructure and Technology for Education - KITE) सदर हाय-टेक क्लासरूम प्रकल्प राबविण्यात आला आहे.

केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्याचा दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.